रंग अंतरंगाचे
कमाल आहे ह्या मनाची,
कावऱ्या बावऱ्या नजरेची.
किनारा बागडणाऱ्या स्वप्नांचा,
कीडा वळवळतो आत स्फूर्तीचा.
कुत्सित जर असेल मती,
कूर्मासारखी होईल गती.
केतकीचा सुगंध दरवळे,
कैवल्यप्राप्ती साठी मन उताविळे.
कोप-ताप नेहमीचेच आहे,
कौशल्य माफीचे महान आहे.
कंटक वाटेतले होतील दूर,
कः! जेव्हा आयुष्याचा गवसेल सूर..
Comments
Post a Comment